बीड
अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना खाऊन देणार आणि बसून फुटलेल्या कापूसासह पिकांचे अतोनात नुकसान

अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना खाऊन देणार आणि बसून फुटलेल्या कापूसासह पिकांचे अतोनात नुकसान
कोळगांव, दि.२८ (बाळासाहेब घाडगे):- दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्वत्र आनंद असतो पण शेतकरी जीवनातील आनंद या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे.मागील पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण पाऊस पडत आहे. शेतात सुगीचे दिवस असल्याने कापूस वेचणी, सोयाबीन काढणे इतर पिकाची सोंगणी चालू आहे. पण एकप्रकारे बाप खावून देयनां.., अन् आई भीक मागून देयनां याप्रमाणे हा अस्मानी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना खाऊन देत नाही आणि बसून देत नसून सुलतानी हवामान खात्याच्या अंदाजानुसार धाकधुक करत आहे. दिवसभर वेचलेला कापूस शेतकऱ्यांची कमानी अचानक पडलेल्या पावसामुळे रानात कापूस आणण्यासाठी गाडी वाहन चिखलातून जात नसल्याने मन दाबून उघड्या रानात ठेवून घरी घोर लागून बसावे लागत आहे.
बीड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदी नाल्याला महापुर येवून काठावरील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर सध्या सुरू असलेल्या म्हणजे दिवाळी सणाच्या धामधुमीत मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊसाने नुकसान होत आहे. तर दि. २६,२७,२८ ऑक्टोबर २०२५ रोजी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेकडो गावात अतिवृष्टी जोरदार पाऊस पडला. यामध्ये फुटलेल्या कापूसासह सोयाबीन तूर ऊस पिकाचे नुकसान झाले. या झालेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन तूर मका आणि फळपिके, भाजीपाला, फळधारणा केलेल्या मोसंबी चे मोठे नुकसान होवून फटका बसला आहे. ऊसाचे फडं आडवी होवुन नुकसान झाले.
कापूसाच्या वाती कोंब तर सोयाबीन काळे पडले…
या अतिवृष्टी परिस्थितीमुळे सुपीक भागातील शेतपीके कापूस, भाजीपाला , फळे नुकसान होत आहे. शेतकरी, सामन्य नागरिकांचे प्रचंड हाल आणि फुटलेल्या कापूसाच्या वाती होवून कोंब फुटले, तर सोयाबीन काळे पडत आहे. दिवाळी सणाच्या आदी ओल्या दुष्काळाची मदत देणार म्हणून सरकार, आणि आमदार लोकप्रतिनिधी सांगत होती पण शासनाने पंचनामे, कागदी घोडे नाचवत शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे.
फोटोओळ- दिवसभर एक एक बोंड वेचणी केलेला कापूस पडत्या पावसात बैलगाडीतून हाल अपेष्टा सहन करत पावसाबरोबर सुलतानी संकटे येत आहे.



