जामखेड शहरात पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवींच्या चिञ रथाचे भव्य स्वागत !

जामखेड शहरात पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवींच्या चिञ रथाचे भव्य स्वागत !
जामखेड प्रतिनिधी;-राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर ह्या जगतमाता आहेत.राजमाता,राष्ट्रमाता या उपाधी योग्य आहेत,त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चिञ रथ संपूर्ण राज्यभर व देशात फिरत आहे.चौंडी या गावी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून अनेक मंत्री येणार आहेत.उत्सव समिती मार्फत मोठी जय्यत तयारी सुरू आहे.अशी माहिती माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी बोलताना दिली.
राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे ३००व्या जन्म शताब्दी निमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक मंञालयाचे वतीने संपुर्ण महाराष्ट्रात आहिल्यादेवींचे कार्य पोहचावे म्हणुन तयार करण्यात आलेल्या आहिल्यादेवींच्या चिञ रथाचे दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी जामखेड शहरात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात व माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद यांच्या हस्ते व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय’ असो अशा घोषणांनी जामखेड शहर दुमदुमून गेले.
यावेळी बोलताना जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की,३०० वर्षापुर्वी या मातेने जन्म घेतला आणि समतेचा भाव संपूर्ण महाराष्ट्रात व देशात पसरवला होता.त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी या देशातून, महाराष्ट्रातून त्यांच्या मागे हजारो सैनिक त्यांच्या पाठीशी होते.पुण्श्लोक अहिल्यादेवींचे कर्तृत्व हिमालयाहून मोठे आहे. अटकेपासून, कन्याकुमारी पर्यंत अहिल्यादेवींनी समाज कार्य प्रभावीपणे केले होते.या संपूर्ण देशात समाज व्यवस्था चांगली झाली पाहिजे,माहिलांना वेगवेगळ्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत.देवधर्माला जाताना माहिलांना अडचण झाली नाही पाहिजे,पाण ओटे झाले पाहिजे, देवस्थानाचा विकास झाला पाहिजे.या कामासाठी अहिल्यादेवींनी आपला जन्म पणाला लावला होता.त्यांचा
जन्म चौंडी या गावी झाल्याने त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे.३१ मे रोजी जयंतीदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनेक मंत्री अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.
यावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर ,ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात ,भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, नगरसेवक डॉ ज्ञानेश्वर झेंडे, मोहन पवार, दिगंबर चव्हाण, तात्यासाहेब पोकळे,युवा नेते संजय काशिद,अमित जाधव, डॉ अल्ताफ शेख,ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे, प्रविण बोलभट, उध्दव हुलगुंडे,अर्जुन म्हेत्रे, राम पवार,प्रविण होळकर, कल्याण हुलगुंडे,संतोष गव्हाळे,सुनील यादव,शिवकुमार डोंगरे, शुभम हुलगुंडे,तुषार बोथरा, विजय कुलकर्णी,मासाळ सर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौंडी येथे होणार देशातील सर्वात मोठा महोत्सव
” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनी येणार पंतप्रधान यांच्या समवेत मंत्री
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा राम शिंदे यांनी ३१ मे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा, महासचिव विनोद तावडे, माजी मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली येथे भेटून दिले होते.



