📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पाटोद्याच्या जयभवानी महाविद्यालयात युवतींना कराटे प्रशिक्षण

पाटोद्याच्या जयभवानी महाविद्यालयात युवतींना कराटे प्रशिक्षण
मुलींच्या स्वसंरक्षणासाठी उपक्रम
पाटोदा (प्रतिनिधी) दिनांक १२ ऑगस्ट : पाटोदा येथिल       जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महाविद्यालयात ग्रामीण भागातील युवतींना स्वसंरक्षणासाठी “कराटे प्रशिक्षणाचा कोर्स “सुरु करण्यात आला आहे.प्राचार्य डॉ.विश्वास कदम ( जय भवानी महाविद्यालय शिवाजीनगर तथा गढी ) यांच्या प्रेरणेतुन ग्रामीण भागातील मुलीसाठी  महाविद्यालयात युवतीसाठी मोफत कराटे प्रशिक्षण चालवले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,छत्रपती संभाजीनगर च्या आदेशान्वये  मुलीसाठी तीन महीन्याचे कराटे प्रशिक्षण प्रशिक्षण कोर्स महाविद्यालयात चालवला जातो.विद्यार्थी विकास मंडळ ,आयोजित महाविद्यालयात युवती कराटे प्रशिक्षण कोर्स सुरु आहे.श्री.कंकरसिंग टाक व कु.मयुरी जाधव हे प्रशिक्षक म्हणुन दररोज मुलींना कराटे प्रशिक्षण देतात.प्राचार्य डॉ.विश्वास कदम सर यांच्या प्रेरणेने व प्र.प्राचार्य प्रा.सोमनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास मंडळाच्या प्रमुख विद्यापीठ अधिसभा सदस्या श्रीमती प्रा.डॉ.कल्पना घारगे व प्रा.डॉ.बंडू लोखंडे हे प्रशिक्षणासाठी अथक परिश्रम घेत आहेत.ग्रामीण भागातील मुलींचा या कराटे प्रशिक्षण कोर्स साठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.मुलींच्या स्वसंरक्षणासाठी हे कराटे प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे.या आगळ्या वेगळ्या उपक्रमा बद्दल महाविद्यालयाचे पालक वर्गातुन कौतुक होत आहे.
Back to top button