महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परीक्षेत आदित्य फिजिओथेरपी कॉलेजचा डंका

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परीक्षेत आदित्य फिजिओथेरपी कॉलेजचा डंका
तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के
प्रतिनिधी | बीड
शहरातील आदित्य फिजिओथेरपी महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीत यश मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये माधुरी बाळासाहेब सुरवसे हिने प्रथम क्रमांक पटकावला. माधवी सुधाकर भगत हिने द्वितीय, तर प्रतीक्षा अशोक गवई हिने तृतीय क्रमांक मिळवला. द्वितीय वर्षात प्रियांका विजयराव कोळी हिने प्रथम, प्रतीक्षा राजेंद्र कसबे हिने द्वितीय आणि रक्षंदा मोमीन हिने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम वर्षात प्रीती शिवाजी सरोदे हिने प्रथम, विशाल मारुती पवार याने द्वितीय आणि समृद्धी शिर्के हिने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा यांनी केले. द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक मिळवणारी प्रियांका कोळी म्हणाली की, महाविद्यालयात अभ्यासासाठी समृद्ध ग्रंथालय आणि वाचनालयाची उत्तम सोय आहे. शांत वातावरण आणि उपलब्ध संदर्भग्रंथांमुळे आम्हाला परीक्षेची तयारी करणे सोपे झाले. तर तृतीय वर्षात प्रथम क्रमांक मिळवणारी माधुरी सुरवसे म्हणाली की, अनुभवी शिक्षक आणि त्यांनी वेळोवेळी केलेले योग्य मार्गदर्शन यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो. कठीण विषय सोपे करून शिकवल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला.
—
केवळ अभ्यासच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना उत्तम आरोग्यदूत म्हणून घडवणे हेच आमचे ध्येय आहे.
-डॉ. आदिती सारडा,
संचालिका, आदित्य शिक्षण संस्था.
—-
ग्रामीण भागातील मुले आव्हानात्मक क्षेत्रात प्रगती करत आहेत
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना आदित्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी, अनुभवी प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधांचा संगम यामुळेच हे यश शक्य झाले आहे. ग्रामीण भागातील मुले फिजिओथेरपीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात प्रगती करत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे



