बीड

सारोळा प्रशालेत…पहिले पाऊल शाळास्तर शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 1

सारोळा प्रशालेत…पहिले पाऊल शाळास्तर शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 1

*#इयत्ता आठवी निरोप समारंभ उत्साहात संपन्न…!*

जामखेड(प्रतिनिधी):जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा या ठिकाणी सोमवार,दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी पहिले पाऊल शाळास्तर शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 1 व इयत्ता आठवीचा निरोप समारंभ कार्यक्रम,आदर्श सारोळा गावचे आदर्श सरपंच अजयदादा काशिद यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांचे शारीरिक विकास, बौद्धिक विकास,सामाजिक व भावनात्मक विकास,भाषा विकास, गणन पूर्वतयारी या क्षेत्रानुसार विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमतांचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालका समवेत विकासपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच पालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. याकामी अमृता रसाळ,शबाना शेख ,वृषाली खांदवे,अंगणवाडी सेविका शुभांगी होशिंग व विमल काळे , मदतनीस अनिता पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शैक्षणिक वर्ष 2025-26 इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एकूण 26 विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत आलेल्या सर्व शैक्षणिक अनुभवांचे, प्रसंगांचे कथन आपल्या मनोगतमधून भावूकपणे व्यक्त केले.तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती आलेल्या विविध अनुभवाचे वर्णन आपल्या मनोगत व्यक्त केले. यावेळी आदर्श सारोळा गावचे आदर्श सरपंच आदरणीय अजय दादा काशीद यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत मधून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचे ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने आपला शैक्षणिक प्रवास आत्मविश्वासपूर्वक प्रामाणिकपणे व मेहनत घेऊन करावा असा मोलाचा संदेश दिला.तसेच शिष्यवृत्ती, एन एम एम एस परीक्षा, क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन व सहशालेय उपक्रम यामध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे आवर्जून विशेष अभिनंदन दादांनी केले.साक्षी गोवर्धन मुळे हिने एन एम एस एस गुणवत्ता यादीत क्रमांक संपादन केल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतप्रती कृतज्ञता व्यक्त करत शालेय परिपाठ करिता एकूण सोळा हजार रुपयांची(16000/-) रुपयांची आहुजा कंपनीची ट्रॉली (साऊंड सिस्टिम) उपलब्ध करून दिली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सांबर भात व जिलेबी याचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी सारोळा गावचे सरपंच अजयदादा काशीद,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, पोलीस पाटील सिद्धेश्वर पवार,सुग्रीव सांगळे,अभिमन्यू काळे,संभाजी मुळे,सुधीर देवा कुलकर्णी,अंगणवाडी सेविका होशिंग,विमल काळे, मदतनीस अनिता पवार,विद्या मंगेश मुळे,रूपाली मंगेश मुळे,माता,पालक,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारोळा शाळेचे ग्रेड मुख्याध्यापक संदिप भालसिंग सर,पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे ,राहुल लिमकर,उपाध्यापक प्रशांत होळकर ,उपाध्यापिका शबाना शेख ,वृषाली खांदवे व अमृता रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button