बीड

बीड नगर परिषदेची एकहाती सत्ता द्या विकास करून दाखवतो – आ. विजयसिंह पंडित

बीड नगर परिषदेची एकहाती सत्ता द्या
विकास करून दाखवतो – आ. विजयसिंह पंडित
 
बीडच्या प्रभाग १ व १२ मध्ये आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराचा झंझावात

बीड, दि.२२ (प्रतिनिधी) ः- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अजितदादांनी जसा बारामतीचा विकास केला तसा विकास आपल्या बीड शहराचा करायचा आहे. बीड शहराचे आमदार विरोधी पक्षाचे असले तरी ना.अजितदादांनी पक्षभेद  न करता कोट्यावधी रुपयांचा निधी बीडसाठी दिलेला आहे. मी तुमचा आणि ना. अजितदादा यांच्यामधील मध्यस्थ आहे. तुमचे सर्व प्रश्न माझ्या मार्फत मी त्यांच्यापर्यंत नेऊन ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन त्यासाठी नगर परिषदेची सत्ता आपल्या हातात येणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि शिवसंग्राम पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार बहुमताने विजयी करा असे आवाहन आ.विजयसिंह पंडित यांनी केले. बीड शहरातील प्रभाग क्र.१ व १२ मध्ये मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

बीड नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि शिवसंग्राम पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह प्रभाग क्र.१ चे उमेदवार सौ.सविता भास्कर जाधव आणि काळे धनंजय बाळासाहेब तर प्रभाग १२ मधील उमेदवार सौ.मोरे सिता भैय्यासाहेब, सौ.जवकर सारीका सचिन यांच्या प्रचारार्थ आ. विजयसिंह पंडित यांनी  या दोन्ही प्रभागाचा झंझावाती प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कमी कालावधीत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी बीडसाठी मंजुर करून आणला. अंडरग्राऊंड लाईट, स्टेडीयमसाठी निधी, आयटी पार्क, रखडलेला रेल्वे मार्ग अशा अनेक कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. ना.अजितदादा हे बारामतीचे आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या बीड शहराला बारामती सारखे सुंदर बनविण्यासाठी आपण सर्वांनी गट-तट मतभेद विसरून राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार भरघोस मताने विजयी करून ना.अजितदादांच्या हातात नगर पालिकेची सत्ता द्या, विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, पक्षाचे निरीक्षक माजी आमदार संजय दौंड, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, बळीराम गवते, निसारभाई, माजी नगरसेवक भास्कर जाधव, कृष्णा वनगुजरे, रमेश चौरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (शिंदेगट) आणि शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मतदारांनी आ.विजयसिंह पंडित  यांचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी महिला भगिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह केलेल्या प्रचार दौऱ्यामुळे मतदारांमध्ये उत्साह संचारला आहे.

Back to top button