बीड

राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो ः प्राचार्य  डॉ. शिवानंद क्षीरसागर

राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो ः प्राचार्य  डॉ. शिवानंद क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी)ः सौ. के.एस.के. महाविद्यालय, बीडचे 2025-26 चे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे मौजे काकडहिरा ता.जि.बीड येथे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन दि.15 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाले. याप्रसंगी नवगण शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे , डॉ. विश्वंभर देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, सरपंच अमोल बागलाने, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळानकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून व्यक्तीमत्व विकास होतो. समाजसेवेची आवड निर्माण होते. सांघीक जिवन जगण्याचा मुलमंत्र प्राप्त होतो. विद्यार्थ्यांनी ग्रामिण भागाशी संपर्क व संवाद या शिबीरादरम्यान करणे आवश्यक आहे. शिबीराच्या माध्यमातून जिवण उपयोगी संस्कार होत असतात म्हणून विद्यार्थ्यांनी तनमनाने या शिबीरामध्ये सहभाग नोंदवावा.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळानकर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले  की, राष्ट्रीय योजना शिबीरामध्ये विद्यार्थी नवनविण ज्ञान व अनुभवाने संस्कारीत होत असतो. शिबीरार्थीनी आपल्या ज्ञान व कलागुणांनी शिबीर गाजवले पाहिजे. आपल्यातील सकारात्मक ऊर्जा कारणी लागली पाहिजे. शिस्त, श्रम याची जोड शिबीरामध्ये लागत असते म्हणून शिबीरार्थी  विद्यार्थ्यांनी आपल्यातील शक्ती ग्रामिण भागासाठी लावण्याची आवश्यकता आहे.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे म्हणाल्या की, राष्ट्रीय योजना शिबीरामध्ये सहभाग मिळणे विद्यार्थ्यांसाठी परवनी असते. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोन करायला हवे. आपल्या नेहमीच्या जिवनापेक्षा शिबीरातील वातावरण अत्यंत आनंदायी व उत्साहवर्धक असते. रोज राबवले जाणारे उपक्रम श्रमदान व वैचारीक देवान घेवाण ही फक्त शिबीरामध्येच होत असते.
मौजे काकडहिरा गावचे सरपंच श्री. अमोल बागलाने म्हणाले  की, सौ. के.एस.के महाविद्यालयाचे शिबीरार्थी एक आठवडा आमच्या गावात राहणार असून विविध सामाजिक कार्य करणार आहेत. आमचा गाव त्यांना पुर्ण सहकार्य  करणार आहे. हे शिबीर अविस्मरणीय कसे होईल यादृष्टीने आमचा प्रयत्न राहील.
या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय योजना शिबीराचे कार्यक्रमाधिकारी डॉ. यादव घोडके,डॉ. प्रमोद गायके, डॉ. सय्यद इमादोद्नि, डॉ. पल्लवी इरलापल्ले, प्रा. जयंत साठे, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. पद्माकर ससाणे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अस्लम शेख, प्रा. प्रियंका नवले, प्रा. ज्ञानेश्वर घोडके, प्रा. संजय काळे, प्रा. आघाव,  व मोठया संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.
Back to top button