बीड

कागदाची किमया न्यारी, मनाला आनंद देते भारी या हस्तकलेचे सूर्यकांत कोकाटे यांच्या वतीने सारोळा प्रशालेत सादरीकरण…!

कागदाची किमया न्यारी, मनाला आनंद देते भारी या हस्तकलेचे सूर्यकांत कोकाटे यांच्या वतीने सारोळा प्रशालेत सादरीकरण…!

जामखेड (प्रतिनिधी): मंगळवार, दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा या ठिकाणी “कागदाची किमया न्यारी, मनाला आनंद देते भारी ” या तत्वाचे प्रणेते,हस्तकला तज्ञ सूर्यकांत नारायण कोकाटे यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या समोर कार्यानुभव (कार्यशिक्षण) या विषयांतर्गत विविध रंगीत कागदापासून विविध कागदी वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी हस्तकला सुलभक कोकाटे यांनी हस्तकलेच्या माध्यमातून कागदी टोपी, जपानी व इंडियन शिडी, कमळ,गुलाबाचे फूल, तोरण व आकाशकंदील यासारख्या विविध कागदी वस्तू तयार करून दाखविल्या. अतिशय ओघवत्या शैली मध्ये तसेच साध्या, सोप्या पद्धतीने व विद्यार्थांना सहज समजेल या भाषेत प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले.याबद्दल सूर्यकांत कोकाटे यांचा सारोळा प्रशालेच्या वतीने यथोचित सन्मान करून त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी हस्तकला सुलभक सूर्यकांत कोकाटे,सारोळा प्रशालेचे मुख्याध्यापक माजीद शेख, पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे सर,राहुल लिमकर उपाध्यापक प्रशांत होळकर ,उपाध्यापिका शबाना शेख ,वृषाली खांदवे व अमृता रसाळ तसेच सारोळा शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या अप्रतिम अशा उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल,जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय प्रदिप चव्हाण साहेब,विस्तार अधिकारी जालिंदर खताळ साहेब, केंद्रप्रमुख विक्रम बडे साहेब,आदर्श सारोळा गावाचे आदर्श सरपंच रितुताई अजयदादा काशिद ,शाळा व्यवस्थापन समिती सारोळा अध्यक्ष सतीश मुळे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे तसेच सर्व ग्रामपंचायत व एस. एम.सी.समिती सदस्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांचे विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले.

Back to top button