संपादकीय

रोजगारक्षमतेसाठी आजीवन शिक्षण महत्त्वाचे – प्रो.सोमनाथ घाडगे


पाटोदा : दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयात अजीवन शिक्षण विस्तार विभागाच्या वतीने उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ बळीराम राख होते तर प्रमुख पाहुणे प्रो.सोमनाथ घाडगे (इतिहास विभाग प्रमुख,जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ पाटोदा ) उपस्थित होते. मंचावर कनिष्ठ उपप्राचार्य नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा.अनिल जोगदंड होते.  मंचावरील सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजीवन शिक्षण विस्तार विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रो.डॉ.प्रकाश फड यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रो सोमनाथ घाडगे म्हणाले की,”रोजगार क्षमतेसाठी आजीवन शिक्षण महत्त्वाचे आहे”.कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य प्रो.डॉ बळीराम राख यांनी केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रो.डॉ.राजाभाऊ धायगुडे यांनी केले तर आभार डॉ आर पी पवार यांनी मानले.कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

Back to top button