देशविदेश

भारत पाकिस्तान सामन्यावर बाबा रामदेव यांची खोचक प्रतिक्रिया

 

भारत-पाकिस्तान देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेट संनयव्हर आता विविध स्थरातून प्रतिक्रिया येताना दिसून येत आहे, त्यातच यावर आता आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅच संदर्भात योगगुरु रामदेव बाबा यांनी सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना हा देशहितविरोधी आहे, असे वक्तव्य केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

तसेच पुढे बोलताना रामदेव यांनी सिने सृष्टीतील ड्रग्ज प्रकरणावरदेखील प्रतिक्रिया दिली. “बॉलिवूडमध्ये नशा करण्याचं विनाशकारी तंत्र सुरु आहे. हे भावी पिढीसाठी धोकादायक आहे. सर्व इंडस्ट्रीने मिळून आपला कचरा साफ करायला हवा. ड्रग्ज त्यांच्यासाठीच आत्मघातकी आणि धोकादायक असेल,” असे रामदेव बाबा म्हणाले.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी इंधन दरवाढीवरदेखील प्रतिक्रिया दिली. पेट्रोलचे दर कमी होण्याचं स्वप्न कधी ना कधी पूर्ण होणार आहे, असे रामदेव बाबा म्हणाले. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलताना वरील एक वाक्य म्हणत त्यांनी भविष्यात इंधनाचे भाव कमी होतील असा आशावाद व्यक्त केला.

Back to top button