📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
श्रीवर्धन (संदेश घोलप)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीवर्धन तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात झेंडावंदन व वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वप्निल सुनील पाब्रेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच विविध सेलचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडावंदनाने करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष मंदार तोडणकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. सभा फिरफिरे, सभापती सुचिन किर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पक्षाच्या स्थापनेपासूनच्या २७ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती हे कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. पक्षाच्या घोषणा आणि उत्साही वातावरणामुळे परिसर राष्ट्रवादीमय झाला होता.
या प्रसंगी बोलताना तालुकाध्यक्ष मंदार तोडणकर यांनी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तर महिला तालुकाध्यक्ष सौ. सभा फिरफिरे यांनी महिलांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक करत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने श्रीवर्धन तालुक्यात पक्षाची एकजूट, ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा एकदा अधोरेखित केला.
Back to top button