बीड

तेलंगशी जि.प. शाळेत इंटरॲक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन; डिजिटल शिक्षणाला चालना

तेलंगशी जि.प. शाळेत इंटरॲक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन; डिजिटल शिक्षणाला चालना

जामखेड | प्रतिनिधी :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलंगशी येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ६५ इंची इंटरॲक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन करण्यात आले. तेलंगशी ग्रामपंचायतीच्या वतीने हा पॅनल शाळेस देण्यात आला असून मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सरपंच सौ. कविता दिगंबर ढाळे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

खर्डा बीटचे विस्तार अधिकारी अशोक आंधळे व केंद्रप्रमुख केशव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. उद्घाटनप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवन्नाथ ढाळे, ग्रामपंचायत सदस्य सुहास जायभाय तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अण्णासाहेब काळे, राहुल पवार,ज्ञानेश्वर चौरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक कुमटकर भाऊसाहेब यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.

शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोरे यांच्यासह शिक्षकवृंदातील पारखे मल्हारी,अशोक जाधव, रविंद्र धस, बाळासाहेब खेडकर व संतोष खेडकर आदी उपस्थित होते. इंटरॲक्टिव्ह पॅनलमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययनाचा लाभ मिळणार असून डिजिटल शिक्षणाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Back to top button