भगवान श्री पुरुषोत्तमांच्या उत्तरपूजा व अभिषेक सोहळ्यात आ. सुरेश धस यांची उपस्थिती

भगवान श्री पुरुषोत्तमांच्या उत्तरपूजा व अभिषेक सोहळ्यात आ. सुरेश धस यांची उपस्थिती
आष्टी (प्रतिनिधी) : गोदावरीच्या पावन तीरावर वसलेल्या श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस यांनी भगवान श्री पुरुषोत्तमांच्या उत्तरपूजा (सांगता आरती), अभिषेक व दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाचा त्यांनी नम्रतापूर्वक स्वीकार केला.
भारतामधील भगवान श्री पुरुषोत्तमांचे एकमेव मंदिर म्हणून श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरीला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. विशेषतः अधिक मासाच्या कालावधीत लाखो भाविक या पवित्र तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी येत असतात.दर्शनानंतर आ. धस यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार व विकासकामांची पाहणी केली. तसेच उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिराच्या कामाचाही आढावा घेत संबंधितांशी चर्चा केली.गोदावरीच्या सान्निध्यात वसलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्राची कीर्ती, वैभव आणि धार्मिक महत्त्व भविष्यात अधिक वृद्धिंगत होवो, अशी प्रार्थना त्यांनी प्रभूचरणी केली.



