बीड
किसन बाबा यांची नवनाथ बाबा यांनी निरपेक्ष सेवा केली:- ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री

किसन बाबा यांची नवनाथ बाबा यांनी निरपेक्ष सेवा केली:- ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री
गोरक्षनाथ टेकडी येथे भाविक भक्तांची मांदियाळी
बीड (प्रतिनिधी) विसाव्या शतकातील महान संत सदगुरू ह.भ.प.वै. किसन बाबा महाराज यांची ह.भ.प.गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांनी निरपेक्ष सेवा केले. आज श्री गोरक्षनाथ टेकडी येथील दिसणारे वैभव हे गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांनी आपले गुरू किसन बाबा यांची निरपेक्ष भावनेतून सेवा केल्यामुळे दिसत आहे. किसन बाबा यांची गुरुवर्य नवनाथ बाबा यांनी निरपेक्ष सेवा केली असे ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री यांनी अभंग विवेचना भावना व्यक्त केली.
विसाव्या शतकातील महान संत सदगुरू ह.भ.प.वै.किसन बाबा महाराज यांच्या 28व्या पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मध्ये द्वितीय कीर्तन रुपी सेवा ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री यांनी अर्पण केले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करताना शिवानंद महाराज शास्त्री पुढे असे म्हटले की श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे आज जो अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उत्साह दिसत आहे तो अध्यात्माचा उत्साह आहे व या उत्साहाच्या पाठीमागे सदगुरू किसन बाबा महाराज यांची गुरुवर्य नवनाथ बाबा यांनी केलेली निरपेक्ष सेवा भाव होय.
परीस हा फक्त लोखंडाचे सोने करतो परंतु साधुसंत हे दगडाच सोनं करतात . नाथांची गादी ही सुखाची वाटते परंतु नाथांची गादी ही आगीची जागा आहे. साधुसंत हे चंदनाप्रमाणे असतात जसं चंदनाचे झाड तुटतानाही तोडणाऱ्याला सुगंधी देत .करत तसं साधुसंत हे त्रास देणाऱ्याचे सुद्धा जीवन सुखकार करतात असे शास्त्री महाराजांनी अभंग अभंग विवेचन केले
जगामध्ये जी माणसं स्वतःला छोटी समजतात तीच माणसं जगामध्ये आहेत खूप मोठी असतात परंतु ते जगाला भासू देत नाहीत तसं सदगुरू किसन बाबा महाराज व गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांची उंच अगणित आहे परंतु ते जगाला भासू देत नाही दाखवत नाही हेच साधूंच मोठेपण आहे असे शास्त्री महाराज म्हणाले
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे शनिवारी द्वितीय कीर्तन सेवा ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री यांची संपन्न झाली यावेळी जिल्हाभरातील ख्यातनाम गायक मृदंगाचार्य गायनाचार्य वादनाचार्य तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते



