बीड

बीड न.प.अध्यक्ष पदासाठी अनुसुचित जातीच्या जागेवर चुकीची उमेदवारी

बीड न.प.अध्यक्ष पदासाठी अनुसुचित जातीच्या जागेवर चुकीची उमेदवारी
दि.24 ,नोव्हेंबर रोजी आंबेडकरी समाज बांधवांची निर्णायक बैठक

बीड/प्रतिनिधी:-बीड न.प. निवडणुकीत अनुसूचित जातीच्या महिलासाठी आरक्षित झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी युवा रिपाइं प्रदेशध्यक्ष पप्पू कागदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय युतीमधून अजित पवार यांच्या गटाकडून जाहीर करण्यात आलेली उमेदवारी नाकारून ऐनवेळी आयात करण्यात आलेल्या व समाजाशी कसलीही बांधिलकी नसणाऱ्या उमेदवारास घडी या चिन्हावर उमेदवारी देऊन मागासवर्गीयांना आरक्षणाच्या संधीपासून डावलणाऱ्या अजित पवार गटाच्या उमेदवारास धडा शिकवण्यासाठी सोमवार दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता हॉटेल नीलकमल येथे बीड शहरातील आंबेडकरी समाज बांधवांची निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

   अजित पवार यांच्या गटाकडून ऐनवेळी पप्पू कागदे यांना उमेदवारी डावलून आयात केलेल्या उमेदवारास उमेदवारी देऊन आरक्षणाच्या संधीपासून मागासवर्गीयांना डावलण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे बीड जिल्ह्यासह  शहरातील आंबेडकरी समाज बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी व ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवारास पराभूत करण्यासाठी बीड शहरातील बौद्ध, मातंग, चर्मकार, वाल्मिकी, वडार व अनुसूचित जामातीमधील समाज बांधवांसह आंबेडकर समाज बांधवांची निर्णायक बैठक सोमवार दि.24 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल नीलकमल, नगर रोड बीड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
   तरी या निर्णायक बैठकीस बीड शहरातील सर्व आंबेडकरी समाज बांधवांनी दि. 24 नोव्हेंबर 2025 सोमवार रोजी ठीक 10  वाजता हॉटेल नीलकमल, नगर रोड बीड येथे उपस्थित रहावे. असे आवाहन बीड शहरातील सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Back to top button