
जिल्हाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार, जिल्हा रूग्णालयाचे” फायर ऑडीट “चौकशीसाठी विभागीय वन आधिका-याला आदेश, वनविभाग आधिकारी म्हणतात विषय आमच्याशी निगडीत नाही :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
__________________ बीड जिल्हा रूग्णालयाने 6 वर्षापासून फायर ऑडीट न केल्याबद्दल तसेच रूग्णालयातील अग्निरोधक यंत्रे मुदतबाह्य असून रेकॉर्ड रूमला लागलेली आग संशयास्पद असून त्याप्रकरणात उच्च स्तरीय चौकशी करण्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त औरंगाबाद, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव यांना केल्यानंतर संबधित प्रकरणात माहिती आधिकारात माहिती मागितली असता जिल्हादंडाधिकारी यांनी सदर प्रकरणात विभागीय वन आधिकारी बीड यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर वनविभागातील कार्यालयाशी माहिती आधिकारात माहिती मागितली असता जनमाहिती आधिकारी म्हणतात विषय आमच्याशी निगडीत नाही, यावरूनच जिल्हाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार दिसुन येतो.
सविस्तर माहीतीस्तव:-
__________________ 10 जानेवारी रोजी भंडारा येथिल दुर्घटनेनंतर 11 जानेवारी रोजी बीड जिल्हा रूग्णालयामधिल 6 वर्षापासून फायर ऑडीट न केल्याबद्दल तसेच गेल्यावर्षी जिल्हा रूग्णालयातील रेकॉर्ड रूमला लागलेली आग संशयास्पद असून तत्कालीन जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.अशोक थोरात यांची आग लागून सुद्धा फायर ऑडीट का करण्यात आले नाही याविषयी वरीष्ठ स्तरावरून स्वतंत्र कमिटी मार्फत उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत वरिष्ठ आधिका-यांना केली होती.
त्यानंतर वरील प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत कोणती कारवाई करण्यात आली याविषयी माहिती आधिकारात माहिती मागवली असता, जिल्हादंडाधिकारी बीड यांनी वरील प्रकरणात विभागीय वन आधिकारी बीड यांना आदेशित करून चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी असे लेखी आदेश दिले आहेत.
विषय आमच्या कार्यालयाशी निगडीत नाही:-जनमाहिती आधिकारी, विभागीय वन आधिकारी
__________________ वरील प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वनविभागीय आधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार काय कारवाई करण्यात आली या विषयी माहीती आधिकारात माहिती मागितली असता जनमाहिती आधिकारी तथा मुख्यलेखापाल, विभागीय वन आधिकारी बीड यांचे कार्यालय मार्फत वरील माहिती आमच्या कार्यालयाशी निगडीत नसल्यामुळे अर्ज निकाली काढत असल्याचे लेखी कळवले आहे.