लॉकडाऊन च्या काळात उध्वस्त झालेल्या पत्रकार शेतमजूर दुकानदार गोरगरिबांना भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी पत्रकार वैजनाथ गायकवाड यांचा आत्मदहनाचा इशारा.

परळी (प्रतिनिधी)
कोरोना महामारी काळात सततच्या लॉकडाँउन मुळे आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झालेल्या पत्रकार, शेतमजूर, शेतकरी, छोटे व्यावसायिक दुकानदार व गोरगरिबांना शासनाच्यावतीने भरीव मदत मिळण्या बाबत पत्रकार वैजनाथ गायकवाड यांनी लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे अन्यथा 15 ऑगस्ट 2021 रोजी परळी येथील राणी लक्ष्मीबाई टाँवर येथे भर चौकात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
जे नागरिक किरायाच्या घरात राहतात जे दुकानदार किराण्याच्या दुकानात आपला व्यवसाय करतात, ज्या महिला दुसऱ्याची धुणीभांडी करून जगतात अशा विधवा परित्यक्ता महिलांचे आर्थिक विवंचनेतून खूप मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर बाबीकडे शासन व प्रशासन यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार वैजनाथ गायकवाड यांनी हे पाऊल उचलले असून आज रोजी लोकांच्या घरातील राशन संपले आहे, तेल, मीठ ,मिरची हे संपले आहे. केवळ शासनाच्या राशन दुकानावरील राशन व शासनाच्या हजार दीड हजार रुपयाच्या तुटपुंज्या मदतीवर गोरगरिबांनी जगायचे कसे हा मोठा प्रश्न आहे.
खोटी प्रतिष्ठा व खोटी लाज जास्त दिवस टिकणार नाही पोटाच्या भुकेची आग एक दिवस या सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शासन व प्रशासनाने वेळीच या गंभीर बाबीकडे लक्ष घालून जे पत्रकार शेतकरी शेतमजूर आर्थिक दृष्ट्या सततच्या लाँकडाँऊन लावल्यामुळे उध्वस्त झाले आहेत त्यांना शासनाने तात्काळ भरीव मदत देण्यात यावी अशी विनंती पत्रकार वैजनाथ गायकवाड यांनी लेखी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे सदर निवेदनाची दखल घेऊन न्याय नाही मिळाल्यास 15 ऑगस्ट 2021रोजी परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील भर बाजारात, भर चौकात असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.