संपादकीय

अनिल बोंडेंकडून अमरावती हिंसाचाराचं समर्थन, तर ऑडिओ क्लिप ट्वीट करत मलिकांचा हल्लाबोल !

 

अमरावती | अमरावतीमधील हिंसाचारावरून अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर आरोप केला आहे. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप मलिक यांनी शेअर केली असून बोंडे यांनी दंगलीचं समर्थन केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. अमरावतीतील हिंसाचारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात मलिक यांनी आता अनिल बोंडे यांच्यावर आरोप केला आहे.

नवाब मलिकांनी ट्विटर अकाउंटवरुन ट्विटर स्पेसचा एक ऑडिओ शेअर केला आहे. “अमरावतीतील भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप ऐका… झूठ बोले कौआ काटे…”, अशा कॅप्शनसह ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल बोंडे यांनी अमरावती दंगलींचं समर्थन केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ट्विटर स्पेसच्या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल बोंडे म्हणतायत की, “गोध्रा दंगलीनंतर अहमदाबादेत दंगली झाल्या नाहीत. दरवर्षी अहमदाबादेत काहीतरी करून दंगली व्हायच्या. मात्र मोदी सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून तिथे दंगली झाल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस राज्यात मुख्यमंत्री होते, तेव्हा दंगली झाल्या नाहीत. भाजपाचं सरकार जिथे सत्तेस असतं तिथे दंगली करण्याची हिंमत कुणाची नसते. ज्या ठिकाणी सेक्युलर किंवा डाव्या विचारसरणीचं सरकार येतं त्या-त्या ठिकाणी दंगली होतात.

Back to top button