नाशिक

नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या शुभेच्छांच्या बँनरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गायब….

 

नाशिक | नाशिक महानगर पालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबंदी सुरु केली आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेने पाठोपाठ आता शिवसेना पक्षांनी सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात आज पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यांवर आले असून त्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र बॅनर झळकले आहे. मात्र दुसरीकडे स्वागतासाठी लावलेल्या बँनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते बिटको रुग्णालयाचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नामकरण करण्यात आले. या रुग्णालयाच्या समोरच शिवसेनने मोठे होर्डिंग्ज लावले आहेत त्यात बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांच्यांसाह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो छापण्यात आले आहे मात्र या बॅनर मधून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब झालेला दिसून आले आहे त्यामुळे या बँनरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे रुग्णालयाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं आहे. मात्र कार्यक्रमाला महापौर, आयुक्त यांची ही अनुपस्थिती राहिली. याबाबत न्यूज १८ लोकमतने या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रशांत दिवे यांना विचारले असता त्यांनी हा होर्डिंग महापालिकेने लावला असल्याचं उडवा उडवीच उतरत देत या प्रकरणी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून, ही सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्याची घोषणा संजय राऊत यांनी सहा महिन्यांपूर्वीच केली आहे. त्यानंतर संघटनात्मक फेरबदल केल्यानंतर राऊत यांनी नाशिकमध्ये लक्ष घातले आहे. शुक्रवार पासून राऊत नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

Back to top button