नाशिक

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा- संजय राऊत

 

सध्या देशात स्वतंत्रवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच आपले दिसून आले होते. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावरून नाव वाद निर्माण झाला होता. त्यात शिवसेना पक्षाने सुद्धा सामना आग्रलेखातून विरोधकांवर आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली होती.

त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी वीर सावरकर यांनी भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नाशिक येथे पत्रकार माध्यमांशी बोलताना बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक होते. त्यांनी देशाला क्रांतीची दिशा दाखवली. त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्माण केलं. ब्रिटीशांच्या मनात दहशत निर्माण केली. मदनलाल धिंग्रासारखे लोक निर्माण केले. ते क्रांतिकारकांचे शिरोमणी होते, अंसं राऊत म्हणाले.

Back to top button