संपादकीय

मुस्लिम आरक्षणासाठी समाजानं रस्त्यावर उतरावं का?

 

राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाचा मुद्धा गाजत असताना आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील आघाडी सरकारला पाच सवाल केले आहेत. तसेच आरक्षणासाठी मुस्लिमांनी रस्त्यावरच उतरलं पाहिजे का? असा सवालही असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. आता यांच्या या विधानामुळे नव्या विषयाला तोंड फुटले आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला आहे. आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. विषमता संपली पाहिजे. मुस्लिमांना शिक्षणात 4 टक्के आरक्षण द्यायला हवं, असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. मुस्लिमांना आरक्षण न देणं हा अन्याय आहे. मुस्लिमांची सामाजिक, आर्थिक दुर्बलता कोर्टाने मान्य केली आहे तर अडचण काय आहे? असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.

आम्ही जाब विचारला तर आम्हाला जातीयवादी ठरवता. तुम्ही अन्याय करता त्याचं काय? राज्यातील मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे. सर्वच मुस्लिमांना देऊ नका. पण मुस्लिमांमधील 15 जातींना कोर्टाने आरक्षण द्यायला सांगितलं आहे. त्यांना तर आरक्षण द्या, असं ते म्हणाले. आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. आता आम्हीही रस्त्यावर उतरावं का? तुम्हालाही तेच हवं आहे का? असा सवाल त्यांनी सरकारला केला.

Back to top button