संपादकीय

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी माजी महापौराचा राष्ट्र्वादीत प्रवेश |

 

मुंबई | मुंबई महानगर पालिकानिवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात शविसेना पक्षाला सत्तेतून खाली उतरवण्यास सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबंदी सुरु केली आहे. त्यातच आता मुंबईत फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये माजी महापौरांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी आज प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. निर्मला सामंत यांच्या प्रवेशाने पक्षाला मुंबई मनपा निवडणुकीत अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

या पक्षप्रवेशावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्या चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, अर्बन सेल प्रदेश सेक्रेटरी सुरेश पाटील, माजी नगरसेविका अल्पना पेंटर आदी उपस्थित होते.

Back to top button