बीड
गेवराई येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन

गेवराई येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन
स्वामी भक्तांसह भाविकांनी सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा
गेवराई : अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सचिदानंद स्वरुप सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त दि.२० एप्रिल ते दि.२६ एप्रिल दरम्यान गेवराई येथील दत्त नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी स्वामी भक्तांसह भाविकांनी सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित गेवराई येथे दि.२० एप्रिल पासुन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त सेवा केंद्रात ७ दिवसीय सप्ताह कालावधीत ,सामुहिक गुरुचरित्र पारायण, यज्ञ याग, गणेश याग, मनोबोध याग, गिताई याग, स्वामी याग, चंडी याग, रुद्र याग, मल्हारी याग, प्रहर सेवा सह अदि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि २६ रोजी पुण्यतिथी उत्सव निमित्ताने सकाळी साडे दहाच्या नैवेद्य आरती सह पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताह कालावधीत सेवेकरी यांनी स्वामी चरणी सेवा रुजु करुन पुण्यतिथी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गेवराई केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.



