बीड

संशयित आठ इसम शेवगाव पोलिसांच्या ताब्यात …

संशयित आठ इसम शेवगाव पोलिसांच्या ताब्यात …

२ गावठी कट्टे ८ जिवंत काडतुसे से ४ मॅक्झिन २ स्कॉर्पिओ गाड्या ११ मोबाईल एकूण १३ लाख ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !

शेवगाव पोलिसांची कामगिरी !

अहिल्या नगर:-पैठण होऊन शेवगाव कडे येणाऱ्या दोन काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाड्यांमधील आठ संशयतांना शेवगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे साडेतीन ते चार च्या दरम्यान अटक केली असून त्यांच्याकडून २ गावठी कट्टे ८ जिवंत काडतुसे से ४ मॅक्झिन २ स्कॉर्पिओ गाड्या ११ मोबाईल एकूण १३ लाख ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत हस्तगत करण्यात आला.
शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पैठण तालुक्यातून शेवगाव कडे येत असून त्यांचे कडे गावठी बनावटीचे कट्टे आहेत अशी माहिती मिळाली. माहितीच्या आधारे नागरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदर डे व सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे यांनी एक पथक तयार करून शेवगाव शहराच्या क्रांती चौकामध्ये नाकाबंदी केली. त्यानंतर पहाटे ५ वाजेच्या दरम्यान दोन स्कॉर्पिओ गाड्या एम एच १६ एक बी ५४५४ व एम एच १७ ए झेड ४१९९ दोन्ही गाड्या शेवगाव च्या क्रांती चौकात आल्या नंतर त्यांना पोलिसांनी हटकले. संबंधित वाहनांमध्ये एकूण आठ जण आढळून आले.१) अंकुश महादेव धोत्रे, वय २४, रा. बोरगांव, अहिल्यानगर २) शेख आकीब जलील, वय २७, रा‌ मुकुंदनगर अहिल्यानगर, ३) सुलतान अहमद शेख, वय ४७, या. गोविंदपुरा अहिल्यानगर, ४) दीपक ज्ञानेश्वर गायकवाड, वय २५, शिवाजीनगर कल्याण रोड अहिल्यानगर, ५) मुक्तार सय्यद सिकंदर, वय ४०, रा‌. अहिल्यानगर, ६) पापाभाई बशीर बागवान, रा. वय २७, वेस्टर्न सिटी श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, ७) सोहेल जावेद कुरेशी, वय २२, रा. फातेमा हाऊसिंग सोसायटी, श्रीरामपूर, ८) आवेज जुबेर शेख, वय २८, मिल्लत नगर, वार्ड क्रं १ श्रीरामपूर, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या वाहनांची झडती घेतली असता २ गावठी कट्टे ८ जिवंत काडतुसे से ४ मॅक्झिन २ स्कॉर्पिओ गाड्या ११ मोबाईल एकूण १३ लाख ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले. पंचा समक्ष ह्याा मुुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला
पोलीस नाईक आदिनाथ वामन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा ३/२५ तीन एप्रिल गुरुवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे करत आहेत.
‌ सदरची कारवाई शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे, पो काॅ चंद्रकांत कुसारे, पो काॅ आबासाहेब गोरे, किशोर काळे, आदिनाथ वामन, श्याम गुंजाळ, भगवान सानप, राहुल खेडकर, संपत खेडकर, राहुल आठरे, प्रशांत आंधळे, एकनाथ गर्कळ, होमगार्ड अमोल काळे, रवी बोधले, शिंदे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पो काॅ राहुल गुड्डू यांनी केली.

Back to top button