बीड
तलवाडा करांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यास कटिबद्ध – प्रशासक चोपडे,ग्रामसेवक मुसळे

तलवाडा करांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यास कटिबद्ध – प्रशासक चोपडे,ग्रामसेवक मुसळे
सार्वजनिक बारव,अंबिकानगर विहीर,गाव तलावातील विहिरीत ब्लिचिंग पावडर….
गेवराई प्रतिनिधी :-पावसाळ्यात तलवाडा कराचे आरोग्य हित जोपासण्यासाठी त्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी प्रशासक म्हणून आणि ग्रामविकास अधिकारी या नात्याने आमची संयुक्त जबाबदारी असल्याचे मत नव्याने प्रशासक म्हणून नियुक्त झालेले चोपडे दादा आणि ग्रामविकास अधिकारी सोपान मुसळे यांनी व्यक्त करत कर्मचारी यांनी तलवाडा येथील सर्व सामान्य नागरिकांना नियमित पाने सोय सुविधा पुरवाव्यात असे सांगितले.
तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत पोइतांडा या महसूल गावाला स्वातंत्र्य ग्रामपंचायत चा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तलवाडा ग्रामपंचायत चे कार्यकारी मंडळ बरखास्त होऊन या ठिकाणीं कामकाज पाहण्यासाठी पंचायत समितीची डेप्युटी इंजिनियर श्री.चोपडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ग्रामसेवक पाटील यांच्या जागेवर सोपान मुसळे यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून हे दोन्ही प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायत चा कारभार सुरळीत चालवण्यासाठी जबाबदारीने काम करतांना दिसत असून गावकऱ्यांनी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी करताच त्यांनी पाणी पुरवठा कर्मचारी दत्ता मोरे यांना सूचना देऊन बिलिचिंग पावडर ने पाणी शुद्ध करण्याचे सांगितले.यावेळी मोरे यांनी तात्काळ सार्वजनिक बारव,अंबिकानगर विहीर,आणि गाव तलावातील विहिरीत बिलिचिंग पावडर टाकून शुद्धीकरण केले त्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासक चोपडे आणि ग्रामविकास अधिकारी मुसळे यांचे आभार मानले.



