बीड

जलजीवन मिशनमधील बोगस कारभार उघड – लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे.

जलजीवन मिशनमधील बोगस कारभार उघड – लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे.
आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर तीव्र आंदोलन करू:- प्रकाश उजगरे
बीड (प्रतिनिधी):वडवणी तालुक्यातील मौजे मोरवड येथे जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतील गंभीर भ्रष्टाचार, बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात विद्यार्थी नेते प्रकाश उजगरे, सरपंच विवेक अंडील आणि गावकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला. संबंधित ठेकेदाराने अतिशय निकृष्ट, अपूर्ण व चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले असून, शासनाची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. संबंधित ठेकेदार संस्थेला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकणे, स्वतंत्र तांत्रिक समिती मार्फत कामाची सखोल चौकशी चुकीच्या पद्धतीने झालेले सर्व काम मूळ अंदाजपत्रकानुसार नव्याने करणे, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी व शिस्तभंगात्मक कारवाई
या मागण्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लेखी स्वरूपात कारवाईचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले “प्रशासनाने लेखी स्वरूपात त्वरित चौकशी आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत उपोषण मागे घेतले आहे. मात्र, जर आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
Back to top button