बीड
एक पहलवानाची संघर्षगाथा; पुणे येथे पार पडणार पै. बबन काशिद यांचा “लपेट लाल मातीची” आत्मचरित्राचा प्रकाशन

एक पहलवानाची संघर्षगाथा; पुणे येथे पार पडणार पै. बबन काशिद यांचा “लपेट लाल मातीची” आत्मचरित्राचा प्रकाशन
जामखेड प्रतिनिधी – “लपेट लाल मातीची” एका पहिलवानाची संघर्ष गाथा या पै. बबन काशिद यांच्या पहेलवानांना संपुर्ण मार्गदर्शनपर आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता पुणे शहरातील कोथरुड येथील गांधीभवन सभागृहात संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी
या आत्मचरित्राचे प्रकाशन छत्रपती पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र केसरी पै. विष्णुतात्या जोशीलकर यांच्या शुभहस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ८९ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे असणार आहेत. तसेच कार्यक्रमासाठी महाराष्ट्र केसरी पै. अशोकभाऊ शिर्के, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, महाराष्ट्र केसरी पै. रावसाहेब मगर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी मान्यवर, पै-पाहुणे व मित्रमंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पै. बबन काशिद यांच्या ‘लपेट लाल मातीची’ या आत्मचरित्राचे लक्षणीय विशेष पै. बबन काशिद यांना कुस्ती जगताचे आलेल्या अनुभवांचे विशेष चित्रण, पहिलेवानांची जीवनपद्धती, त्यांचे राहणीमान, तालमीतले जग, त्यांचा सराव आणि आहार, आर्थिक उलाढाल, वेगवगळे कुस्ती फड, याचे चित्रण साकारतानाच यात मार्गदर्शक सुचनाही या कथनात दिलेल्या आहेत.
कुस्तीगीर म्हणून पहिलवानांचे आयुष्य तसे सुखकर नसते. जोपर्यंत कुस्तीत त्यांचे नाव असते, तोपर्यंत त्यांची वाहवा होते. त्यानंतर समाज त्यांच्याकडे फारसा पाहत नाही.
पहिलवानांचे कुस्ती प्रकारातील कौशल्यतंत्रे, विविध प्रकारचे डाव, चपळता, स्वतःच्या मालकीचं काहीच नसणं, स्वयंपाक करणं, सामूहिकता, रॅगिंग, एका ताटात जेवण करणं, काही पहिलवानांच्या अरेरावीचे चित्रण या आत्मकथनात आहे.



