पांडुरंग माने यांच्या पाठपुराव्याला यश;अहिल्यादेवी महिला सन्मान पुरस्कार वितरणाला गती

पांडुरंग माने यांच्या पाठपुराव्याला यश;अहिल्यादेवी महिला सन्मान पुरस्कार वितरणाला गती
गावगावच्या अहिल्यांचा गौरव ! जामखेड तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींकडून महिलांचा सन्मान
जामखेड प्रतिनिधी:महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील ५८ पैकी ५२ ग्रामपंचायतींनी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत पुरस्कार वितरित केले आहेत. उर्वरित ६ ग्रामपंचायतींना दोन दिवसांत हे पुरस्कार वितरित होतील, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी दिली.
या उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागप्रमुख पांडुरंग माने यांनी १९ जून २०२५ रोजी शासन स्तरावर निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले असून, तालुक्यात व्यापक स्तरावर पुरस्कार वितरण पार पडत आहे.
या यशस्वी मागणीची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांचा यथोचित सन्मान पांडुरंग माने यांच्या हस्ते करण्यात आला. या सन्मानप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जामखेड तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, मोहा ग्रामपंचायतीचे सरपंच भिमराव कापसे,शिवकुमार डोंगरे, सुग्रीव भोसले (उपसरपंच – खर्डा), माजी उपसरपंच मदन पाटील, श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य व मनसे नेते वैभव जमकावळे उपस्थित होते.



