बीड

रा.काँ.पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीसपदी गोरख मोमीन

रा.काँ.पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीसपदी गोरख मोमीन

बीड (प्रतिनिधी)दि.२ : सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख मोमीन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागात जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे. बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांची ही निवड करण्यात आली.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद सरपते, तालुकाध्यक्ष बबनराव वाघमारे, तालुका उपाध्यक्ष मिलिंद ठोकळ, शहर उपाध्यक्ष गोरख काळे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष मसू पवार, तसेच ऋषी धताडमल, राम कानडे, निलेश लोंढे, गोटू पायके, गणेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. गोरख मोमीन यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांत समाधान व्यक्त करण्यात आले असून सामाजिक न्याय विभागाच्या कामाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Back to top button