📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी महामंडळ कागदावरच ठेवणार का ? – प्रा. सुशीलाताई मोराळे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी महामंडळ कागदावरच ठेवणार का ? – प्रा. सुशीलाताई मोराळे

वडवणी प्रतिनिधी: – मोठा गाजावाजा करत पुण्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले मात्र या महामंडळाची अवस्था अतिशय वाईट आहे, बजेट नाही अनेक ऊस तोडणी मजुरांचा अपघात होतो परंतु कुठलीही मदत मिळत नाही, जिल्ह्याचे कार्यालय कुठे आहे याचा थांगपत्ता नाही. डोंगरेवाडी तालुका वडवणी येथील मजूर गणेश डोंगरे यांचा उसाच्या अंगावर उसाची ट्रॉली पडून मृत्यू झाला. दुसऱ्या दोघांपैकी एकाचा पाय गेला दुसऱ्यालाही दुखापत झाली कारखाना प्रशासनाकडे मदत मागितली तर उडवाउडवीची उत्तर दिली गेली एमडी चेअरमन भेटत नाहीत. या ऊस तोडणी मजुरांना कुणी वाली नाही अशी फरपट त्यांची झाली हा भाऊराव बिराजदार कारखाना अजितदादांनी चालवायला घेतला आहे. दादा तुम्ही पालकमंत्री आहात तात्काळ मदत देण्यासाठी तुम्ही कारखाना प्रशासनाला सांगितले पाहिजे नसता आम्हाला कारखाना बंद करावा लागेल असे प्रतिक्रिया ऊस तोडणी मजूर संघटनाच्या वतीने  प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी दिली आहे.
थंडी वाऱ्यात मजूर ऊस तोडतात मात्र कुठलेही संरक्षण त्यांना दिले जात नाही. धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना इमेजेस संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले होते मात्र ते लाल फितीत अडकले आहेत. महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मजूर संघटनेचे महासचिव म्हणून मी पण चांगल्या सुधारणा सुचवल्या होत्या मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. कारखाना प्रशासनाने थोडी तरी माणुसकी जपली पाहिजे मयत डोंगरेंचे कारखान्यावर गेले परंतु प्रशासनाने उडवा उडवीची उत्तरे दिली अजित दादा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील मयत मजूर आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी मोठी आहे तात्काळ माहित डोंगरे कुटुंबाला मदत करावी असे आव्हान पत्रकात प्रा. सुशीला ताई मोराळे यांनी केले आहे.

Back to top button