बीड

जामखेड महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सवलतीत लायसन्स योजना

जामखेड महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सवलतीत लायसन्स योजन

जामखेड, १६ ऑक्टोबर :
जामखेड महाविद्यालय, जामखेड व दत्त कृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “सवलतीत लायसन्स” ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीच्या दरात मोटार ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या उपक्रमासाठी जामखेड येथील एस.टी. डेपो मॅनेजर म्हणून प्रदीर्घ सेवा बजावलेले श्री. एस.सी. देवकर यांनी महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात ड्रायव्हिंग प्रशिक्षण व लायसन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात श्री. देवकर यांनी विद्यार्थ्यांना मोटार कायदे, वाहन चालविताना पाळावयाचे नियम, शिस्त तसेच शासनाचे निर्णय याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही मोटार ड्रायव्हिंगविषयी आपले प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जी. पुराणे यांनी विद्यार्थ्यांसाठी ही अनोखी व उपयुक्त योजना राबवल्याबद्दल कौतुक व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,

लायसन्स हे फक्त कायदेशीर परवानगी नसून जबाबदार नागरिकत्वाचे प्रतीक आहे.”

डॉ. पुराणे यांनी गाडी चालवताना घ्यावयाची काळजी, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी टू व्हीलर किंवा बसने महाविद्यालयात येतात; त्यामुळे त्यांच्यासाठी लायसन्स अत्यंत आवश्यक आहे.

महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबवत असते आणि ही सवलतीत लायसन्स योजना त्याच परंपरेचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शाम गोलेकर, कला शाखाप्रमुख प्रा. अविनाश फलके, डॉ. वासुदेव सरोदे, प्रा. दिलीप महारनवर, प्रा. सुनील मोहळकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Back to top button