डॉ. ओम कोल्हे यांना बी.जे. मेडिकलमधून एमबीबीएस पदवी

डॉ. ओम कोल्हे यांना बी.जे. मेडिकलमधून एमबीबीएस पदवी
आई-वडिलांचे कष्ट आणि मुलाची जिद्द – साकारले डॉक्टरपदाचे स्वप्न
जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड येथील डॉ. ओम उमा संजय कोल्हे यांनी आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून बी.जे. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, पुणे येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. कोल्हे यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
डॉ. ओम यांचे वडील श्री.संजय व आई सौ.उमा कोल्हे हे दोघे स्वतः च्या क्लिनिक लॅब मध्ये रक्त ,युरीन तपासणी करण्याचा व्यवसाय असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. पालकांच्या कष्टांमुळे आणि स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर डॉ. कोल्हे यांनी शासकीय वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण केले.
सामान्य घरातून येत असूनही कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर डॉ. कोल्हे यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. त्यांच्या या यशामागे पालकांचा त्याग, शिक्षणाची ओढ आणि संघर्षाची पार्श्वभूमी आहे.
डॉक्टर कोल्हे यांचे पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शिक्षण दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च विद्यालय येथे झाले असून कुटुंबातील पहिले डॉक्टर आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल जामखेड शहरात व सामाजिक माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव सुरू असून, “संघर्षातून उभारी घेतलेले हे यश आजच्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.



