बीड
ल.ना.होशिंग विद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

ल.ना.होशिंग विद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
जामखेड (ता. १०) –क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शहरातील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी फुले यांच्या समाजसुधारणेतील कार्याची माहिती देताना, “फुले यांनी जातिभेद, अंधश्रद्धा आणि विषमतेविरोधात यशस्वी लढा दिला,” असे सांगितले. स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजजागृती घडवून आणली. कार्यक्रमात उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने व अन्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे तर आभार प्रदर्शन संगिता दराडे यांनी मानले.



