📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ॲड.डॉ.अरुण(आबा)  जाधव यांचा सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून गौरव

ॲड.डॉ.अरुण(आबा)  जाधव यांचा सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून गौरव
अहिल्यानगर – इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ‘३१ ऑगस्ट’ भटके विमुक्त दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद लोंढे यांनी ॲड.डॉ.अरुण(आबा)जाधव यांचा सन्मानचिन्ह ,शाल, श्रीफळ देऊन गौरव केला.यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी विनोदकुमार लाड, तुकाराम कातखडे तसेच सिने अभिनेते सचिन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष असलेल्या डॉ. जाधव यांना सामाजिक कार्यात बहुमोल योगदानाबद्दल गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. समारंभात उपस्थितांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत समाजहितासाठी केलेल्या योगदानावर आदर व्यक्त केला.
Back to top button