बीड
बीड येथे होणाऱ्या शेतकरी हक्क मोर्चा शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा.

बीड येथे होणाऱ्या शेतकरी हक्क मोर्चा शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा.
पदाधिकारी कार्यकर्ते शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे भाई मोहन गुंड यांचे आवाहन
केज /प्रतिनिधी:-राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असून शेतीमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, शेतीमालाला हमीभाव द्यावा ही मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासूनची आहे खालील मागण्या या अत्यंत महत्त्वाच्या असून शास्त्र आहे याच्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेच आहे, कापूस. शेतीमालाच्या खरेदीवर आणि शेतीमालाच्या प्रक्रियेवर शासनाची पूर्ण उदासीनता आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने गुरुवार दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,ते बीड जिल्हाधिकारी कार्यालया वर भव्य शेतकरी हक्क मोर्चा काढण्यात येणार या मोर्चेला शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ भाई मोहन गुंड यांनी पत्रक काढुन पाठींबा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या कापसाला किमान ₹१२००० प्रति क्विंटल भाव देण्यात यावा.
सोयाबीन साठी किमान ₹७००० प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात यावा.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) कडून होणारी अडवणूक थांबवून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा.हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या बाजारसमित्या व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. बाजारात कमी दराने खरेदी झालेल्या शेतमाला चा विक्रीदर व खरेदी दरातील फरक सरकारने अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना भरून द्यावा.
शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सबसिडी, ठिबक,तुषार सिंचन अनुदान व पीक विमा यांची थकीत रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष देत या साठी शेतकरी हक्क मोर्चा निघणार या मोर्चेला जिल्ह्यातील सर्व शेकापचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केले आहे..


