बीड
लिंबागणेशमध्ये ‘श्री तुळजाभवानी केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार!

लिंबागणेशमध्ये ‘श्री तुळजाभवानी केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार!
ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न; ३५० बैलगाड्यांचा सहभाग, प्रथम क्रमांकासाठी ५१ हजारांचे बक्षीस
श्री भालचंद्र प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन; बीडसह सहा जिल्ह्यांतील बैलगाडी मालकांचा सहभाग — डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि. २४) बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र लिंबागणेश येथे शनिवारी ‘श्री तुळजाभवानी केसरी लिंबागणेश २०२६’ या भव्य बैलगाडी शर्यतीचा उत्साहात प्रारंभ झाला. श्री भालचंद्र गणरायाच्या पावन भूमीत आयोजित या स्पर्धेत तब्बल ३५० बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला. बीडसह छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बुलढाणा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील बैलगाडी मालकांनी उपस्थिती लावल्याने स्पर्धेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
लिंबागणेशमध्ये ‘श्री तुळजाभवानी केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार!
ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न; ३५० बैलगाड्यांचा सहभाग, प्रथम क्रमांकासाठी ५१ हजारांचे बक्षीस
श्री भालचंद्र प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन; बीडसह सहा जिल्ह्यांतील बैलगाडी मालकांचा सहभाग — डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि. २४)बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र लिंबागणेश येथे शनिवारी ‘श्री तुळजाभवानी केसरी लिंबागणेश २०२६’ या भव्य बैलगाडी शर्यतीचा उत्साहात प्रारंभ झाला. श्री भालचंद्र गणरायाच्या पावन भूमीत आयोजित या स्पर्धेत तब्बल ३५० बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला. बीडसह छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बुलढाणा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील बैलगाडी मालकांनी उपस्थिती लावल्याने स्पर्धेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
श्री भालचंद्र प्रतिष्ठान, लिंबागणेश व समस्त ग्रामस्थ-मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी ९ वाजता माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, सरपंच बालासाहेब जाधव, ॲड. गणेश वाणी, सुरेश ढवळे, दादा गायकवाड , नाना वाणी,अक्षय आबदार, मंगेश जाधव, अभिजित गायकवाड, संजय पावले, गणपत तागड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
प्रथम क्रमांकासाठी ५१ हजारांचे बक्षीस!
या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये, तर चतुर्थ क्रमांकासाठी १५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय पाचव्या क्रमांकासाठी ११ हजार, सहाव्या क्रमांकासाठी ९ हजार, सातव्या क्रमांकासाठी ७ हजार आणि आठव्या क्रमांकासाठी ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक हजार रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले होते. विविध जिल्ह्यांतील बैलगाडी मालकांच्या सहभागामुळे स्पर्धेच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न! :- डॉ.गणेश ढवळे
बैलगाडी शर्यत ही ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याशी जोडलेली आहे. बैलांशी असलेले शेतकऱ्यांचे भावनिक नाते, ग्रामीण जीवनशैली आणि पारंपरिक खेळांची आवड यांचे दर्शन अशा स्पर्धांमधून घडते. ग्रामीण भागातील परंपरा जतन करण्याबरोबरच विविध गावांतील बैलगाडी मालक आणि शौकिनांना एकत्र आणण्याचे काम अशा आयोजनातून होत आहे.
“बैलगाडी शर्यत ही केवळ स्पर्धा नसून ग्रामीण संस्कृतीचा वारसा आणि शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होते,” अशी भावना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली.
स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री भालचंद्र प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ-मित्र परिवाराने पुढाकार घेतला.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं. ८१८०९२७५७२



