बीड

नारायणगड, भगवानगडाच्या नारळी सप्ताहास डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांची उपस्थिती

नारायणगड, भगवानगडाच्या नारळी सप्ताहास डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांची उपस्थिती
प्रतिनिधी दि.१७ : शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन (तांबा) येथील श्री क्षेत्र नारायणगडाच्या ७३ व्या आणि पिंपळनेर येथील श्री क्षेत्र भगवानगडाच्या ९१ व्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहात कल्पतरुच्या सचिव डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी भेट दिली. संत परंपरेचा वारसा आणि आध्यात्मिक ऊर्जेचं शक्तीस्थान असलेल्या या दोन्ही गडांना भेट देऊन त्यांनी सप्ताहात सहभाग घेतला.याप्रसंगी त्यांनी भगवान गडाचे महंत ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज, भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. संभाजी महाराज या संत-महंतांचे आशीर्वाद घेतले. या भेटींमधून त्यांना अमूल्य आध्यात्मिक प्रेरणा व ऊर्जा लाभल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अनेक सहकारी व भाविक भक्तांचीही उपस्थिती होती, ज्यामुळे वातावरण भक्तिभावाने भारलेले होते.
Back to top button