मुंबई

पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारला टोला

 

देशात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढ मुले सामान्य अंगरिकांचे कंबरडं मोडलं आहे. तसेच वाढत्या महागाईवरून विरोधकांनी जोरदार टीका केंद्र सरकारवर केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या मागणीवरून केंद्र सरकारला टोला लागलेला आहे. डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.

एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढं वाढलं, डिझेलचे भाव तेवढे झाले. तसं नाहीये असे त्यांनी बोलून दाखविले होते.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, हे आपल्या भल्यासाठीच होतंय, असा चिमटा काढतानाच मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असं म्हणता. पण मी खरं की खोटं बोलतो हे तुम्ही सांगा. इंधन परवडेनासं झालं तर तुम्ही म्हणतात तसं प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

 

Back to top button