बीड

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी जिल्हा परिषद मराठी शाळेतच– जालिंदर खताळ

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी जिल्हा परिषद मराठी शाळेतच– जालिंदर खताळ
ऐतिहासिक जि.प.प्राथ.मराठी मुली शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
जामखेड प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा गुणवत्ता वाढीचा वाढता आलेख पाहून पालकांनी आपली मुले व मुली जिल्हा परिषद शाळेत दाखल करावेत असे आवाहन विस्तार अधिकारी जालिंदर खताळ यांनी केले.
शहरातील ऐतिहासिक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुली येथे सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करत दिपप्रज्वलनाने झाली.वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी गुढीपाडवा,पट वाढवा या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली च्या नवीन दाखल पात्र विद्यार्थिनींचे व त्यांच्या पालकांचे स्वागत मंचावर उपनगराध्यक्ष पोपट  राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विस्तार अधिकारी जालिंदर खताळ तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार,शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत,विश्वस्त मंडळाचे मुकुंदराज सातपुते,केंद्रप्रमुख राम निकम, केशव गायकवाड,विक्रम बडे,पांडुरंग मोहळकर,माजिद शेख,आदर्श शिक्षक एकनाथ चव्हाण,जेष्ठ शिक्षक गोकुळ गायकवाड तसेच नगरसेविका प्रिती राळेभात,संगिता भालेराव,प्रा.हिना सय्यद,माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण,युवा नेते प्रशांत राळेभात,धनराज पवार,सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद, विजय काशिद, अमोल सदाफुले, मुख्याध्यापक (मुले) जालिंदर अहिरे,मच्छिंद्र खैरे(मुख्याध्यापक, तपनेश्वर), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा.डाॅ. शिवाजी राळेभात, उपाध्यक्ष निलेश गायकवाड, नितीन टेकाळे तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित म्हणून नगरसेवक पवन राळेभात,माजी नगरसेविका राजश्रीताई पवार,आदर्श शिक्षक विकास बगाडे, बाळासाहेब जरांडे,माजी व्हाईस चेअरमन नारायण राऊत, मल्हारी पारखे, महेश मोरे, प्रशांत कुंभार, विनोद सोनवणे, उपेंद्र आढाव,संतोष ससाणे,जितेंद्र आढाव,संदीप लबडे,अमोल पवार, ब्रह्मदेव हजारे, सूर्यकांत कदम, रविंद्र निकाळजे,उत्तम पवार, शंकर साबळे, संतोष डोके आदी मान्यवर व पालक,विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना खताळ म्हणाले, जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा विश्वास, प्रशिक्षित शिक्षकांचा परिश्रम आणि मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे प्रवेश वाढत आहे. नवोदय, शिष्यवृत्ती, मिशन आरंभ व विविध स्पर्धांमधील यशातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झाली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी जिल्हा परिषद मराठी शाळेत असून पालकांनी न्यूनगंड दूर करून आपल्या मुलांना या शाळांत प्रवेश द्यावा; कारण येथूनच भविष्यातील अधिकारी, इंजिनियर व डॉक्टर घडत आहेत.
उपनगराध्यक्ष पोपट राळेभात म्हणाले, हा कार्यक्रम केवळ करमणुकीसाठी नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आहे. अनेक मोठे अधिकारी व विविध क्षेत्रात यशस्वी झालेले विद्यार्थी याच जिल्हा परिषद शाळेत घडले आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना याच शाळेत प्रवेश द्यावा; मीही याच शाळेत घडल्याचा मला अभिमान आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी मुली येथील उपाध्यापिका निशा कदम,अर्चना भोसले,निर्मला सिद्धेश्वर,सोनाली जोरे,प्रतिभा ढोबळे पाटील,भारती क्षिरसागर,मनीषा पवार तसेच मराठी मुले येथील उपाध्यापिका वंदना मोरे,जया चौभारे,राधा डिसले,अलका धाउड,संध्या खंडागळे,कालिंदा मेहत्रे,साधना आरडक,सरिता कवडे,कल्पना साबळे,सारिका पोले,नितीन मोहोळकर, शुभांगी साळुंखे,लक्ष्मी जायभाय आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशा कदम यांनी केले सुत्रसंचलन अंबादास जोगदंड,सागर माकुडे तर आभारप्रदर्शन दत्तात्रय यादव यांनी मानले.
Back to top button