📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडच्या वतीने ‘‘जागतिक आरोग्य दिन’’ या विशयावर जनजागृती शिबीर संपन्न…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडच्या वतीने ‘‘जागतिक आरोग्य दिन’’ या विशयावर जनजागृती शिबीर संपन्न…
               बीड – किमान समान कार्यक्रम माहे एप्रिल 2026 अंतर्गत दिनांक 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने न्यायिक अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी यांचेकरिता आरोग्य विषयक जनजागूती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम मा. श्री. आनंद एल. यावलकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष साहेब बीड तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमास मा.जिल्हा न्यायाधीष-1 श्री. व्ही. एच. पाटवदकर, मा.श्रीमती एस. आर. षिंदे, जिल्हा न्यायाधीष-2, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ. वहाब ए. सयद, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्षक अॅड. के. एस. पंडीत, तसेच बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी यांची सदर कार्यक्रमास उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्षक अॅड. के. एस. पंडीत यांनी आपल्या भाशणात सांगितले की, आरोग्य विषयक माहिती आरोग्याची कषा प्रकारे काळजी घेतली जावी तसेच ताणतणावापासून दूर राहून दररोज व्यायाम करावा व आरोग्याबाबत महत्वपूर्ण या मार्गदर्षनपर भाशणात त्यांनी सांगितले. तसेच आरोग्याचे महत्व या वेळी पटवून दिले.
त्यानंतर मा. श्री. व्ही. एच. पाटवदकर यांनी आपल्या भाशणात सांगितले की, आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये स्वतःसाठी वेळ काढून आरोग्याची काळजी घ्यावी व स्वतःचे आरोग्य चांगले कसे होईल याकडे लक्ष दयावे असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. आनंद एल. यावलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाशणात बोलताना सांगितले की, डिप्रेषनमुळे जास्तीत जास्त लोकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण भारतामध्ये जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे डिप्रेषनपासून सुटका करण्यासाठी दररोज व्यायाम करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दयावे आरोग्य चांगले तर कुटुंब चांगले राहू षकते असेही त्यानी आपल्या भाशणामध्ये सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. न्यायाधीष श्री. षुभम कराळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्षन न्यायाधीष मुंजारीन जेलर यांनी मानले.
कार्यक्रमाचे यषस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. एस. पी. झेंड, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक श्री. एस. टी. षिंदे व प्राधिकरणचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे षेवटी व्यंगचित्रकार श्री. सुहास पालीमकर यांनी आरोग्य विशयक व्यंगचित्र सदर कार्यक्रमात दाखवून या व्यंगचित्राच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागूती सादर केली.
Back to top button