राजकीय

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका

 

दादरा नगर हवेली येथे लोकसभेची पोटनिवडणूक होत असून भाजपचे उमेदवार महेश गावित यांच्या प्रचार सभेत इराणी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव व दनाह व दमण दीवच्या प्रभारी विजया रहाटकर, भाजपचे उमेदवार महेश गावित, प्रदेशाध्यक्ष दिपेशतांडेल, माजी खासदार नटूभाई पटेल, सिल्वासा शहराध्यक्ष राकेशसिंह चौहान, ज्येष्ठ नेते फतेसिंग चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंचावरून बोलताना केंद्रीय मंत्री स्मुर्ती इराणी म्हणाल्या की,गरिबांना लुटणे, वसुली करणे आणि पायदळी तुडविणे हा सत्तेत असलेल्याचा एकमेव धंदा आहे. अनेक लोक घाबरून बोलत नाहीत.पण, त्यांच्या या अन्यायाला मतदानातून उत्तर द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले

पुढे त्या म्हणाल्या की, कमळ हे भाजपचे चिन्ह आहे. तसेच ते वैभवाचे प्रतीक आहे. या उलट विरोधकांचे चिन्ह हे निरपराध लोकांच्या रक्ताने माखलेले आहे. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असून विरोधकांच्या नेत्यांचा पत्ताच नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली. त्यांच्यासोबत राज्यातील प्रमुख नट्यांची फौज सुद्धा उपस्थित होती.

Back to top button