बीड

पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट  ओढावले असतानाच ढगाळ वातावरणामुळे जोमात आलेले कोबी पिक  रोगांच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडल्याने शेतकरी चिंताग्रस्त :- डॉ.गणेश ढवळे

पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट  ओढावले असतानाच ढगाळ वातावरणामुळे जोमात आलेले कोबी पिक  रोगांच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडल्याने शेतकरी चिंताग्रस्त :- डॉ.गणेश ढवळे
—-
लिंबागणेश:- ( दि.२४ )यावर्षी मे महिन्यात अवकाळी आणि मान्सुनपुर्व पावसाने लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी वाफसा होताच समाधान कारक पाऊस झाल्याने कापुस लागवडीसह तुर,मका, सोयाबीन, खरीप पिकांची पेरणी जोमात झाली.मात्र मागील १५ दिवसांपासून सतत वाढत असलेले तापमान आणि जोरदार वा-यामुळे जमिनीतील ओलावा लवकर आटुन गेला आहे.कोरड्या हवामानामुळे पिकांचे कोवळे अंकुर उन्हाच्या झळांनी जळुन जाण्याच्या स्थितीत आहेत.अनेक ठिकाणी पिके कोमेजु लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वेळेत पाऊस न झाल्यास पिकांचे नुकसान अनिवार्य असुन परीणामी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असुन त्यासाठीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना परवडणार नाही. यातच सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे कोबी सारख्या जोमात आलेल्या पालेभाज्यांवर करपा,मावा,अळी आणि ईतर किडींमुळे कोबीच्या पानांमध्ये छिद्र पडणे,काळे डाग येणे आदी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

कोबीचं पिक जोमात आलंय मात्र ढगाळ वातावरणामुळे किडींमुळे नुकसानीची दाट शक्यता :-  गणपत तागड ( कोबी उत्पादक शेतकरी लिंबागणेश)

दोन एकर शेतीमध्ये उंदडवडगाव येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव यांच्या नर्सरीतुन ६० हजार रोपांची लागवड केली. खते, औषध फवारणी आदी एकुण १ लाख रुपयांचा खर्च आला. कोबीचे पिक जोमात आल्याने अंदाजे ६-७ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.परंतु गेल्या ४-५ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाची सततची भुर भुर यामुळे कोबी पिकांवर करपा,मावा,कीडींमुळे कोबीच्या पानांमध्ये छिद्र पडणे, काळे डाग आदी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पदरात किती पडतंय याबद्दल शंका असल्याचे लिंबागणेश येथील कोबी उत्पादक शेतकरी गणपत तागड यांनी बोलुन दाखवले.

शेतकऱ्यांना निसर्गाने मारले आणि सरकारने वा-यावर सोडले :- डॉ.गणेश ढवळे

बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून ८ लाख ८ हजार ९४६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या प्रस्तावित आहेत. १६जून अखेरपर्यंत या क्षेत्रापैकी ३ लाख ८९ हजार ४४८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून आता जवळपास चार लाख हेक्टर पर्यंत पेरण्या पूर्ण झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४८.१४ टक्के पेरण्या उरकल्या आहेत. मात्र पेरण्या होताच  १५ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने दुबार पेरणीचे ढग दिसू लागल्याने पेरणी झालेल्या आणि पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. अस्मानी संकट ओढावल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना सरकारचे मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्याचे आढळून येत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली.

Back to top button