संपादकीय

टीकाकारांनी टीका केली पण स्वत: सरकारनेच उत्तर दिलंय फडणवीसांचा ठाकरे सरकार टोला

 

आघाडी सरकारने तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी केली आहे. यासाठी जलसंधारण विभागाकडून चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशीमधून आता या योजनेचा फायदा झाला असल्याचं समोर आलं आहे. असा निष्कर्श या समितीकडून काढला आहे. या सर्व प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समितीने जलयुक्त शिवार योजना कशी योग्य आहे आणि काम कसं योग्य झालं आहे, असा अहवाल दिला होता. हा समितीचा अहवाल उच्च न्यायालयाने देखील स्वीकारला होता. त्यामुळं आता आलेला अहवाल त्यावरूनच करण्यात आला असेल. त्यामध्ये काही तक्रारी असू शकतात हे खरं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आम्हीच तक्रारी केल्या होत्या की, ६०० वेगवेगळ्या तक्रारी आल्या आहेत. त्या सर्व तक्रारींची चौकशी केली जाईल. त्यासाठी काहीच हरकत नाही. पण ६ लाख कामांमधून फक्त ८०० किंवा ६०० कामांची चौकशी होणं ही मोठी गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. ते म्हणले की, टीकाकारांनी टीका केली आहे आणि उत्तर पण सरकारनेच दिलं आहे. चौकशी झाली पाहिजे. मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. तसेच यासाठी कोणत्या योजनेला बदनाम करणं चुकीचं ठरू नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Back to top button