आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना नांदेडचे भारत रामिनवारयांचेकडून एक किलो सोनेचा मुकुट अर्पण

आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना नांदेडचे भारत रामिनवारयांचेकडून एक किलो सोनेचा मुकुट अर्पण
पुणे प्रतिनिधी :-आज दि.१७/०६/२५ रोजी
नांदेडच्या श्री. भारत रामिनवार आणि सौ. मिरा रामिनवार यांनी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी १ किलो सोन्याचा, सुमारे १ कोटी रुपये किंमतीचा अलंकारिक मुकुट अर्पण केला. पु ना गाडगीळ आणि सन्स लि.ने चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट तयार केला असून, यामध्ये पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. वारकरी परंपरेशी नातं असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभावाने घडवला. मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण, इत्यादी मंगल प्रतीके आहेत. हा मुकुट विशेष धार्मिक प्रसंगी आज माऊलींना “ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी उपस्थितीत आळंदी” येथे अर्पण केला असून भक्ती, कला आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेला हा मुकुट भाविकांसाठी नक्कीच श्रद्धेचं प्रतीक बनेल .



