विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक व पालकांनी पाठबळ द्यावे – नगरसेवक अमित चिंतामणी

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक व पालकांनी पाठबळ द्यावे – नगरसेवक अमित चिंतामणी
ल. ना. होशिंग विद्यालयात नवागतांचे जल्लोषात स्वागत
जामखेड, दि. १७ (प्रतिनिधी) — शहरातील दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयात “शाळा प्रवेशोत्सव” मोठ्या उत्साहात पार पडला. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देत स्वागत तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की, विद्यार्थी हे शैक्षणिक जीवनातील मुख्य टप्प्यावर असून ते दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत,विद्यार्थी मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाने उज्ज्वल भविष्य घडवतील, पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक पाठबळ द्यावे.
यावेळी विद्यालयात रंगीबेरंगी सजावट करण्यात आली होती. दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डाॅ. सुनील कटारिया, संचालक डाॅ. प्रताप गायकवाड, दिपक होशिंग, पंचायत समितीचे पुस्तक समन्वयक शाहू फाळके, प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी श्रीमती संगीता दराडे मॅडम यांनी
मानले.



