बीड

गेवराईत भर उन्हात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकनाथ शिंदे साहेबांचा बॅनरवरील फोटो पाहून लाडक्या बहिणींनी नोंदणीस घेतला पुढाकार!स्वप्नील गलधर 

गेवराईत भर उन्हात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकनाथ शिंदे साहेबांचा बॅनरवरील फोटो पाहून लाडक्या बहिणींनी नोंदणीस घेतला पुढाकार!स्वप्नील गलधर
गेवराई (प्रतिनिधी) :-शिवसेनेच्या गेवराई व आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या ‘शिवकार्य सदस्य नोंदणी’ मोहिमेला प्रचंड उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रखर उन्हाच्या कडाक्यात देखील शिवसैनिकांचा जोश आणि नागरिकांची उपस्थिती कमालीची होती.
विशेष म्हणजे, बॅनरवरील  एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो पाहून लाडक्या भगिनींनी स्वतःहून पुढे येत शिवसेनेचे सदस्यत्व घेतले. याहून जनमानसामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल असलेली आत्महत्या दिसून येते व एक प्रकारे एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजने
ची ही पावतीच म्हणायची!
 यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई चे  शिवसेनेचे उद्धवजी मडके यांनी या सदस्य नोंदणीचा आयोजन केलं होतं या उपक्रमात धर्मराज आहेर, राजेश डाके पाटील,अमोल सेठ होडे, शैलेश मोटे, नवनाथ गवते, हनुमान खेत्रे, बालाजी जाधव, शहाजी जू आणि कुंडलीक राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी मोहिमेला मोठे यश लाभले.आष्टी विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी अभियान राबवताना.माझ्या समवेत उपजिल्हाप्रमुख वांडरे नाना, उपजिल्हाप्रमुख राहुल चोरे, युवासेना जिल्हाप्रमुख रविराज बडे, तालुका प्रमुख कुमार शेळके आदी शिवसैनिक.
शिवसेनेचा विचार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व गावागावात पोहोचत असून, या सदस्य नोंदणी मोहिमेने नव्या उमेद व नव्या आशेचा जागर केला आहे.
Back to top button