कुंभार्ली जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी मनसे आक्रमक प्रशासनाने डावललं – मनसे ने सावरलं – कुंभार्ली ग्रामस्थ

चिपळूण
मंडणगड तालुक्यातील कुंभार्ली जलजीवन योजनेतील दूषित पाणीपुरवठा व गैरव्यवहार प्रकरणी गेली अनेक महिने ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागत आहेत पण गेंड्याच्या कातडीचे प्रशासन ठेकेदार व सहठेकेदार यांना कायम पाठीशी घालत असून ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे असा गंभीर आरोप ग्रामस्थ करीत आहेत. या विरोधात कुंभार्ली ग्रामस्थ यांनी पंचायत समिती मंडणगड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला होता. याच पार्श्वभूमीवर काल मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. जाधव व पोलीस निरीक्षक श्री. गवारे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी ग्रामस्थांच्या मागणी नुसार ठेकेदार व सहठेकेदार तसेच पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. याच अनुषंगाने आज पंचायत समिती कार्यालयात सकाळी ११ वाजता सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु सदर सभेस ठेकेदार व सहठेकेदार तसेच पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांचा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या सभेला मनसे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत प्रशासन ग्रामस्थांची दिशाभूल करीत जिवाशी खेळ योजना घोषित करण्यासाठी दबाव आणत आहे. ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी संगनमताने योजनेतील निधी लुटत असून योजना कागदावर व जनता वार्यावर अशी स्थितीत आहे . वेळीच ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत पुढील १५ दिवसांत योग्य ती कारवाई न केल्यास मनसे पक्ष कुंभार्ली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मनसे स्टाइलने ठिय्या आंदोलन करील असा सूचक इशारा ही यावेळी दिला. या वेळी कुंभार्ली ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ व महिला मंडळ तसेच कोकण विभागीय संघटक व खेड नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर, जिल्हाध्यक्ष श्री. संतोषजी नलावडे, जिल्हा सचिव श्री. सचिनजी गायकवाड, उपजिल्हा अध्यक्ष संजयजी आखाडे, मंडणगड तालुकाध्यक्ष नवज्योत सिंग गौड, उप तालुकाध्यक्ष स्वप्निल पवार, मुस्तकिम कारविनकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सह संपर्कप्रमुख सचिन संवादकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जितेंद्र सिंग गौड आदी उपस्थित होते.
फोटो : पत्रकारांना जलजीवन मिशन योजनेच्या कारभाराविषयी माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अँड .वैभव खेडेकर जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे आणि पक्षाचे कार्यकर्ते छायाचित्र दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)



