बीड
चेअरमन सुनील पोकळे यांच्या तर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फराळ वाटप

चेअरमन सुनील पोकळे यांच्या तर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फराळ वाटप
दिवाळीनिमित्त दूध उत्पादक शेतकरी बांधवांना गोड भेट
आष्टी (प्रतिनिधी)
दिवाळी या आनंदोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतकरी राजा दूध शीतकरण केंद्राचे चेअरमन सुनील पोकळे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य गरजू नागरिकांना गोड भेट दिली आहे.
या उपक्रमांतर्गत चिंचाळा, राघापूर, सायकड वस्ती, शिदेवाडी, शेडगे वस्ती, जरांगे वस्ती, वारंगुळे वस्ती, शेकापूर या गावांतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकूण १६ क्विंटल फराळाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ८ क्विंटल रवा आणि ८ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले असून, शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
तसेच चेअरमन सुनील पोकळे यांनी सर्वसामान्य गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी अतिरिक्त ३ क्विंटल फराळाचे वाटप करून दिवाळी सणाचा आनंद त्यांच्याही घरी पोहोचवला.
या प्रसंगी चेअरमन सुनील पोकळे म्हणाले, “शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. त्यांनी घाम गाळून अर्थव्यवस्था उभी ठेवली आहे. म्हणूनच दिवाळीत शेतकरी बांधवांनाही आणि गरजू जनतेलाही आनंदाचा गोडवा मिळावा, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.”
या सामाजिक उपक्रमामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी चेअरमन सुनील पोकळे यांच्या या जाणीवपूर्वक व समाजाभिमुख कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
एकूण मिळून १९ क्विंटल फराळाचे वाटप चेअरमन सुनील पोकळे यांनी केले आहे



