बीड
_परळी नगरपरिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकणार: ऐतिहासिक दिग्विजयासाठी आशीर्वाद द्या- बाजीराव भैया धर्माधिकारी_

_परळी नगरपरिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकणार: ऐतिहासिक दिग्विजयासाठी आशीर्वाद द्या- बाजीराव भैया धर्माधिकारी_
*प्रभाग क्रमांक १० मध्ये महायुतीच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
_ना. पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वात परळीच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध!_
परळी वैजनाथ, प्रतिनिधी….
परळी वैजनाथ नगर परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकणार असून या ऐतिहासिक दिग्विजयासाठी आपले आशीर्वाद महायुतीच्या नगराध्यक्षपदा सह सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे करावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. प्रभाग क्रमांक दहा मध्ये राष्ट्रवादी व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पद्मश्रीताई धर्माधिकारी व प्रभाग क्रमांक दहा चे उमेदवार डावरे सरोजा गौतम, प्रभाग क्रमांक दहा ब चे उमेदवार मुंडे महेश गोविंदराव व प्रभाग क्रमांक दहा क च्या उमेदवार चाटे कुसुम आण्णासाहेब यांच्या प्रचार दौऱ्यात या प्रभागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभाग क्रमांक दहा मध्ये तीन जागा असून महायुतीकडून प्रभाग क्रमांक दहा अ मधून डावरे सरोजा गौतम, दहा ब मधून मुंडे महेश गोविंदराव, व दहा क मधून चाटे कुसुम आण्णासाहेब हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या तीनही उमेदवारांनी सातत्याने जनसेवा हाती घेतलेली असून या प्रभागातील नागरिकांची असंख्य कामे केलेली आहेत. त्याचबरोबर महायुतीचे आपले नेते आ. धनंजय मुंडे व ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत याची ग्वाही या प्रचारदौऱ्या दरम्यान माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली.
या प्रभागात काढण्यात आलेला प्रचार फेरीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी, जुगलकिशोर लोहिया, दिलीप आबा बिडगर, निळकंट चाटे, भीमराव डावरे, भीमराव पौळे, दत्तात्रय गुट्टे, संजय आघाव, रवींद्र परदेशी, किशोर पारधे, बालाजी चाटे,गोविंद मुंडे, वैजनाथ चाटे, प्रेमनाथ मुंडे, एकनाथ वडमारे, रमेशराव पाटील, सुभाष ठोके,प्रकाश कदम दिनेश गजमल, प्रल्हाद सुरवसे, शांतीनाथ शिंदे, अशोकराव मुंडे, बाळासाहेब बिडगर, गौतम डावरे, राजू बुंदेले, किशन बुंदेले, विजय आठकोरे, शिवराज सुरवसे,अमोल कानडे, शेख हसन,बीबी तांबोळी, विजय शिंदे, संजय आडसकर, राहुल वडमारे,शिवाजी खांडेकर, जगन्नाथ राठोड, वाल्मिक फड, नारायण नलगे, सदाशिव घुगे, कोडीबा सानप, गुलाबराव चव्हाण, जंगले मामा, बप्पा कुलकर्णी, हर्षवर्धन पौळे, गणेश मोदाणी, प्रशांत कसबे, मंथन जगतकर, विशाल कांबळे, सचिन कांबळे, बालाजी शिंदे,प्रतीक फड, विशाल आघाव, अतुल जाधव, ऋषी राठोड,नरेश मुंडे, अन्वर शेख,समाधान बुरकुले, कृष्णा नलगे, सत्यजित (जितू),बहोत कुणाल चाटे, विशाल खांडेकर, प्रदीप राठोड, रुपेश घवाने, आनंद वाल्मिकी, गणेश लोंढे, मनोज गित्ते, देवा जाधव, किशोर जाधव, आदित्य लोंढे, तेजस होलबोले, अमोल नागरगोगे, सोहम वाघमारे, कैलास बुंदीले आदींसह पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



