बीड

अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर प्रतिनिधित्व करण्याची मराठवाडा शिक्षक संघास संधी

अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर प्रतिनिधित्व करण्याची मराठवाडा शिक्षक संघास संधी
*शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांची AISTF च्या सहसचिव पदी निवड*

बीड / प्रतिनिधी:मराठवाडा शिक्षक संघाचे अभ्यासू व लढाऊ सरचिटणीस राजकुमार कदम यांची अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघ (AISTF) च्या राष्ट्रीय सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल त्यांचे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील मंडळी कडून अभिनंदन करण्यात येत आहे.
याबाबत मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली माहिती अशी की,अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक नुकतीच राजेस्थान येथील जयपूर शहरात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात कार्यरत आसलेल्या मराठवाडा शिक्षक संघाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेण्यात आला व अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाच्या सहसचिव पदी मराठवाडा शिक्षक संघाचे अभ्यासू ,लढाऊ व झुंझार असे सरचिटणीस राजकुमार कदम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.सदरील निवड हि अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.इंद्रशेखर मिश्राजी (बिहार),कार्यकारी अध्यक्ष माजी शिक्षक आमदार नरसिम्हा रेड्डी(आंध्रप्रदेश),राष्ट्रीय सचिव सदानंद गौड (तेलंगणा) यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत करण्यात आली.
यानिवडीमुळे आपल्या राज्यातील शिक्षकांचे व शिक्षण क्षेत्रातील केंद्रीय पातळीवरील प्रश्न केंद्रीय स्तरावर मांडण्यासाठी व मार्गी लावण्यासाठी राजकुमार कदम सर यांचासारखा खंदा प्रतिनिधी आपल्याला मिळाला आहे. त्याबद्दल अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे व राजकुमार कदम यांचे मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक मा.श्री.पी.एस.घाडगे, व्ही.जी.पवार, अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव,*उपाध्यक्ष* ज्ञानोबा वरवट्टे,गुट्टे एस.जी.,*कोषाध्यक्ष* औताडे ए.बी.,*सहसचिव* पवार टी.जी.,माळी एन.जी., श्रीमती रेखा सोळुंके, *केंद्रीय कार्यकारणी* सदस्य बंडू अघाव, अशोक मस्कले, मधुकर जोंधळे, रातोळे जी.जी.,कुरेशी ए.ए.,राठोड पी.आर.,सुर्यवंशी आर.एन.,कदम व्ही.जी.,कौशल्य जी.पी.,पाटोदेकर ए.डी.,सोळंके एन.टी.,वऱ्हाड बी.ए.,तिर्थकर एस.एस.जमादार एफ.बी.पाटील पी.एस.यांच्यासह *जिल्हाध्यक्ष* कालीदास धपाटे, व्यकंटराव चिलवरवार, बसवेश्वर माने,शेरखाने जे.एस.,रमेश आंधळे, यशवंत मकरंद, हरिभाऊ भडके,हाळदे के.एम.,जिल्हासचिव गणेश आजबे, रविंद्र वाकोडे, भाई चंद्रकांत चव्हाण, माने जी.व्ही.,विक्रम मायाचारी,संजय येळवंते, कदम एन.टी.,ढेंगळे व्ही.एस.,दिनेश पाटील व बीडचे माजी जिल्हाध्यक्ष/मार्गदर्शक डी.जी.तांदळे यांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button